पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ४ परदेशी तरुणींसह ६ जणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:59 IST2022-04-14T16:53:22+5:302022-04-14T16:59:38+5:30
स्पा मॅनेजरला अटक

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ४ परदेशी तरुणींसह ६ जणींची सुटका
पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला असून ६ तरुणींची सुटका केली आहे. स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली आहे. सागर शाम पवार (वय ३२, रा. गवळीवाडा, लोणावळा, मावळ) असे या मॅनेजरचे नाव आहे.
मनीष ईश्वर मुथा (रा. कोंढवा आणि राहुल जिगजीनी अशी अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील आय टी आय रोडवरील ओरा स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेतला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरो स्पा येथे बनावट ग्राहक पाठविला. त्याने खात्री केल्यानंतर केलेल्या इशाऱ्यावरुन पोलिसांनी बुधवारी दुपारी तेथे छापा टाकला.
यावेळी थायलंड येथील ४ तर, मेझोराम येथील २ अशा ६ महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्पाच्या मॅनेजर सागर पवार याला अटक केली आहे. त्याच्याकडून ८१ हजार ८९० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, आश्विनी केकाण, स्नेहा धुरी या पथकाने केली आहे.