मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:53 IST2025-01-09T12:52:31+5:302025-01-09T12:53:05+5:30

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली

Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road | मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी पार्लर चालक महिलेला अटक केली.

जोयश्री नरेन तामोली (३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामूनगाव, जि. जोराहाट, आसाम), असे अटक करण्यात आलेल्या मसाज पार्लर चालक महिलेचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंंधक शाखेतील सहायक पोलिस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) सायंकाळी छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली. नांदेड सिटी पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.