रहाटणीत सदनिकेतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दलाल महिलेसह घरमालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 17:25 IST2024-06-13T17:24:47+5:302024-06-13T17:25:53+5:30
पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास रहाटणी येथे ही कारवाई केली.....

रहाटणीत सदनिकेतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दलाल महिलेसह घरमालकावर गुन्हा
पिंपरी : सोसायटीमध्ये सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून एका दलाल महिलेला अटक केली. तसेच या कारवाईत पीडित दोन महिलांची सुटका केली. भाडेकरार न करता सदनिका भाडेतत्वावर दिल्याप्रकरणी घरमालकावर देखील गुन्हा दाखल केला. पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास रहाटणी येथे ही कारवाई केली.
दलाल महिलेसह दशरथ जंगल कोकणे याच्या विरोधात बुधवारी (दि. १२) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दलाल महिलेने दशरथ कोकणे याच्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला.
दलाल महिलेने ती राहत असलेल्या सदनिकेत वेश्याव्यवसाय चालवला. तसेच ती सदनिका दशरथ कोकणे याने कोणताही भाडे करारनामा न करता वेश्याव्यवसायासाठी उपलब्ध करून दिली. सदनिकेत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोन महिलांची सुटका केली.