बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:20 IST2025-12-23T19:20:05+5:302025-12-23T19:20:26+5:30
पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली

बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत
पुणे : बाणेर भागातील एका लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून तरुणींची सुटका केली. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकाला अटक केली असून, व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, सध्या रा. फलक इन लाॅज, लक्ष्मणनगर, बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाळू सुभाष चौधरी, अजितसिंग जितेंद्रपाल गाढोके, दलाल रोशन यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई रोहित पाथरूट यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील लक्ष्मणनगर भागातील एका लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्याने देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली. लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सगर, सहायक निरीक्षक लामखेडे, केकाण आणि पथकाने ही कारवाई केली.