शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बारामती शहरात भर वस्तीत सुरु असलेला वेश्या व्यवसाय उघड; एकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 7:29 PM

पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

बारामती: बारामती एमआयडीसीपाठोपाठ शहरातील भरवस्तीत सुरु असलेला वेश्या व्यवसाय बारामती तालुका पोलीसांनी उघड केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार याप्रकरणी प्रतिक सुरेश ठोंबरे (रा. सूर्यनगरी, बारामती) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची पोलिसांनी सुटका केली. 

भिगवण रस्त्यावर एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर रविवारी( दि. २८)  फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. तालुका पोलिसांना ठोंबरे हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशाचे अमिष दाखवत काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. त्यांच्या आदेशानंतर छापा टाकण्यात आला. त्यासाठी बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे एक हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. ठोंबरे याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी महिला पोलिसांनी येथे उपस्थित असलेल्या महिलेला तिचे नाव विचारले. प्रतिक ठोंबरे याने पैशाचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तिने सांगितले.  या २८ वर्षीय महिलेची पोलिसांनी सुटका केली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल व अन्य साहित्य असा ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSex Racketसेक्स रॅकेट