पुण्यातील रस्त्यावर लावलेलं Property चं बॅनर सोशल मीडियावर होतंय व्हायरल, कारण ऐकून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:50 IST2021-07-16T17:38:47+5:302021-07-16T17:50:20+5:30
Property Add: जाहिरातीमध्ये 1,2,3 किंवा 4 BHK ऐवजी लिहीलंय 0.25 BHK.

पुण्यातील रस्त्यावर लावलेलं Property चं बॅनर सोशल मीडियावर होतंय व्हायरल, कारण ऐकून व्हाल चकीत
पुणे:कंपन्या आपल्या प्रोडक्टची विक्री करण्यासाठी जाहिरातींची मदत घेतात. आजच्या काळात जाहिरातींचं विश्व मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सोशल मीडियापासून रस्त्यांपर्यंत आपल्याला हजारो जाहिराती दिसतात. अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पुण्यातील रस्त्यांवर लावलेल्या जाहिरातीच्या बॅनरनं अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलंय. बॅनरवर लावलेली ही जाहिरात प्रॉपर्टीची आहे. तुम्ही प्रॉपर्टीच्या अनेक जाहिराती पाहिल्या असतील. प्रॉपर्टींच्या जाहिरातींवर 1BHK, 2BHK, 3BHK किंवा 4BHK घरं मिळतील, असं लिहीलेलं असतं. पण, पुण्यात व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीवर 1,2,3, 4 BHK ऐवजी लिहीलंय 0.25 BHK. याच आकड्यामुळे या जाहिरातीने अनेकांचे लक्ष्य वेधून घेतलंय. आता सर्वांनाच उत्सुकता लागलीयं की, 0.25 BHK म्हणजे नेमकं काय आहे ?
जाणून घ्या जाहिरातीचा अर्थ ?
या प्रॉपर्टीच्या जाहिरातीवर लिहीलं आहे की, आम्ही पुण्यात पहिल्यांदाच 0.25 BHK घर घेऊन आलो आहोत. त्याच्या खाली लिहीलंय, 2.75, 2.25 आणि 2 BHK. त्यासोबत लिहीलंय की, नियो कॉस्मोपॉलिटन बना. सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल होत असून, युजर मजेशीर कमेंट्स करत आहेत.