प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे आज पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 11:56 IST2022-03-25T11:56:29+5:302022-03-25T11:56:44+5:30

पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षांचे होते. 

Prominent thinker Sudhir Bedekar passed away in Pune today | प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे आज पुण्यात निधन

प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे आज पुण्यात निधन

पुणे :- मागोवा आणि तात्पर्य या मासिकाचे संपादक आणि सत्तरीच्या दशकामधील मागोवा गटाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षांचे होते. 

कॉ. सुधीर बेडेकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी म्हणजे गीताली सोसायटी पीवायसी कॉलनी डेक्कन जिमखाना जवळ, या ठिकाणी आज दुपारी 4.15 ते 4.45 या वेळेत ठेवण्यात येईल त्यानंतर 5.00 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार केले जातील.

Web Title: Prominent thinker Sudhir Bedekar passed away in Pune today