शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 6:56 PM

शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते?

ठळक मुद्दे शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोहचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जातेशारीरिक हिंसेविषयी खूप बोलले जाते मात्र शाब्दिक हिंसेविषयी मराठीत अजूनतरी अंधारच

पुणे: पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असताना काम नीट न करणा-याला मी लगेच शिवी हासडायचो.  त्यामुळे काम पटकन होते असे लक्षात आल्यावर तिचं  माझी सवय बनली. पण आपण दिलेली शिवी कुणी  लक्षात ठेवेल असे वाटले नव्हते.  सात वर्षांनी तो व्यक्ती भेटल्यावर त्याच्या मानत माझी आजही तीच प्रतिमा आहे हे लक्षात आल्यानंतर खूप वेद्ना झाल्या आणि आपल्या नकळतही आपण किती हिंसा करतो हे जाणवल्यावर त्यावर काहीतरी करण्याच्या जाणीवेतून हा चित्रपट तयार झाला असल्याची प्रांजळ कबुली दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुजय डहाके दिग्दर्शित  ‘तुझ्या आईला’ चित्रपटाचे सादरीकरण झाले. त्यानिमित्त पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी निर्माती मेघना प्रामाणिक उपस्थित होत्या.. चित्रपटाविषयी सांगताना सुजय डहाके म्हणाले,  वडिलांच्या सरकारी नोकरीच्या नियमित बदलीमुळे अविनाश शहरातून एका दुर्गम भागातील खेड्यात बदली होऊन जातो. तेथे गेल्यावर शाब्दिक हिंसेच्या खेळात तो अडकतो. या संकल्पनेभोवती ‘तुझ्या आईला’ हा चित्रपट फिरतो.   शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोहचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जाते. शारीरिक हिंसे विषयी खूप बोलले जाते मात्र शाब्दिक हिंसेविषयी मराठीत तरी अजून कोणी बोललेले नाही. म्हणून या संकल्पनेवर चित्रपट बनविण्याचे ठरवल्याचे सांगून डहाके म्हणाले,  खेडयात, होस्टेलमध्ये अशा शिव्या देण्याचा खेळ खेळला जातो. बरेच शिक्षकही मुलांशी बोलताना अशाच पद्धतीच्या भाषेचा वापर करतात. त्यामुळे या शाब्दिक हिंसेचे धडेही शाळेतूनच मुले गिरवू लागतात. याविषयी विचार होणे ते थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे चित्रपटात अशी शाब्दिक व शारीरिक हिंसा काही प्रमाणात दाखविली असली तरी शेवटी संदेश अहिंसेचा दिला आहे. शिवाय हा चित्रपट स्त्रीवादाकडे झुकणारा असून, शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी शाळा चित्रपट ‘पिफ’ मध्ये दाखविण्यात आलाय. त्यानंतर परत ‘पिफ’ मध्ये यायला तब्बल ९ वर्षांचा काळ लोटला. मात्र यंदा तरी आपला चित्रपट या महोत्सवात पोहचू शकल्याचा आनंद डहाके यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफSujay Dahakeसुजय डहाकेcinemaसिनेमा