शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आयएसएमटी कंपनीचे उत्पादन सुरू होणार

By admin | Updated: August 6, 2015 03:44 IST

एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार

बारामती :एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार दूर झाली आहे. मात्र, व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये याबाबत स्वतंत्र करार करण्यात आला आहे. १२ जुलैपासून कंपनीने उत्पादन बंद ठेवले होते. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. गेल्या २३ दिवसांपासून ४२४ कामगार या निर्णयामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारावर बसून होते. व्यवस्थापन आणि कामगारांच्या झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या. कामगार आयुक्तांनी याबाबत तोडगा काढण्याची सूचना व्यवस्थापनाला केली होती. व्यवस्थापनाने सुरुवातीपासून सकारात्मक, तर कामगारांनी तणावाच्या परिस्थितीतदेखील संयमाची भूमिका घेतली. परिसरातील कामगार संघटनांनी आयएसएमटी कामगार संघटनेला पाठिंबा व्यक्त केला होता. कंपनी बंद करण्याचा निर्णय परिसरात चर्चेचा विषय झाला. मात्र, आता कामगारांचा प्रश्न मार्गी लागला आहे. व्यवस्थापन आणि कामगारांची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये व्यवस्थापनाने सर्वमान्य तोडगा काढला. सोमवारी (दि. ३) व्यवस्थापन आणि कामगारांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये व्यवस्थापनाच्या वतीने मालक बी. आर. तनेजा, उपाध्यक्ष बलराम अग्रवाल, किशोर भारांबे आदींनी सहभाग घेतला. कामगार प्रतिनिधींच्या वतीने अध्यक्ष नाना भगत, सचिव गुरुदेव सरोदे यांनी सहभाग घेतला. या चर्चेत कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेनंतर सर्वमान्य करार करण्यात आला आहे. कंपनीची मोडकळीस आलेली अवस्था असूनदेखील केवळ कामगारांची निष्ठा पाहून मालक बी. आर. तनेजा यांनी चांगला प्रतिसाद दिला. लवकरच कंपनी काही दिवसांत पूर्वपदावर येईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अ‍ॅड. आर. बी. शरमाळे यांची भूमिका हा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची ठरली, असे अध्यक्ष भगत यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष बाळासाहेब आटोळे, संजय जांबले, ज्ञानदेव गाडे, सुहास शिंदे, कल्याण कदम, नामदेव गोरे, संतोष साळवे, उमाजी भिलारे, राजकुमार होळकर, गोपीचंद नवले, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)