शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 22:44 IST2020-12-08T22:43:46+5:302020-12-08T22:44:04+5:30

 विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले, ''शेतकऱ्याबद्दलच्या तीन कायद्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे.

Proclamation in the General Assembly against the anti-farmer law | शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी

शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी

पिंपरी: शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसे नगरसेवकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. सत्ताधारी भाजपच्या वतीने सभागृह चालविण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांनी विषयपत्र फाडून सभात्याग केला. शेतकरी आंदोलनाचे पडसाद महापालिका सर्वसाधारण सभेत उमटले. शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी सभा तहकूब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

 विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले, ''शेतकऱ्याबद्दलच्या तीन कायद्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. भारत बंद पुकारला आहे. सभा शेतकऱ्याचा, कळवळा असेल तर तहकूब करावी. या विषयावर मतदान घेण्यात यावे. एका दिवसाने काहीही होणार नाही. महापौर तुम्ही शेतकरी आहे. त्यामुळे सभा तहकूब केला आहे.'' 

शिवसेना गटनेते राहुल कलाटे, ''शेतकरी हित विरोधी कायद्यावर आंदोलन सुरू आहे. आपणही शेतकरी आहोत, त्यामुळे सभा तहकूबीस अनुमोदन आहे.'' सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ''शेतकऱ्याचा विषय पिंपरी चिंचवडचा नाही, केंद्राचा विषय नाही. सभा झाली पाहिजे, आम्ही शेतकरी विरोधात नाही.'' 

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ''शेतकरी कुटूंबातील आपण आहोत. पक्षाचा विरोध नाही. ही सभा उदया घ्या. आता सभा तहकूब करा. या विषयावर मतदान घ्या. कोण कोणाबरोबर ते कळेल. '' माजी महापौर राहुल जाधव म्हणाले, ''भारत बंद हा शेतकरी आंदोलनाचा भाग आहे.आम्ही शेतकर्याबरोबर आहे. आजपर्यंत तीन नगरसेवक निधन झाले. अनेक सभा तहकूब झाली आहे. शहराचा योग्य निर्णय घ्यावा.'' 

उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, ''कायदा शेतकरी हिताचा की नाही हे तपासायला हव्यात. तज्ञांच्या शिफारशी स्वीकारल्या केंद्राने स्वीकारल्या जात आहेत. विरोधाला विरोध नसावा.'' 

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ''उपमहापौर याना बिनविरोध निवडून दिले त्याचे सार्थक झाले. शेतकरी आंदोलनात लोक रोजदारीने येतात. तुमचे आंदोलन चांगले आणि आमचे चुकीचे. १४ दिवस आंदोलन करणारे रोजनदारीने आणले हा कामगारांचा अपमान आहे. मॅनेज आंदोलन आहे, हे म्हणणे चुकीचे.'' सीमा सावळे म्हणाल्या, ''विधेयकात चुकीचे काय असेल तर दुरूस्ती केली जाईल. लोकशाहीचे आम्ही पुरस्कर्ते आहोत, आपल्याकडे हुकूमशाही नाही.'

Web Title: Proclamation in the General Assembly against the anti-farmer law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.