Pune Traffic Advisory: शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:40 IST2026-02-18T18:31:09+5:302026-02-19T12:40:48+5:30

Pune Shiv Jayanti Celebration: छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.

Procession through central Pune on the occasion of Shiv Jayanti; Changes in the traffic system of 'Ya' Ratsyas | Pune Traffic Advisory: शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

Pune Traffic Advisory: शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

Pune Traffic Update: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (१९ फेब्रुवारी) वाहतूक बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, तसेच पं. जवाहरलाल नेहरू रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. गर्दी ओसरेपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मध्य भागातून मिरवणूक काढण्यात येते. मध्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील हुतात्मा चौकातून स्वराज्य रथ मार्गस्थ होतात. शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल येथे मिरवणुकीचा समारोप होईल. स्वराज्य रथांच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स.गो. बर्वे चौक, झाशीची राणी चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. गणेश रस्ता, जिजामाता चौक या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी दारुवाला पूल मार्गे इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पूरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना मार्गे शिवाजीनगरकडे जावे. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून शिवाजीनगरकडे जावे, तसेच मध्य भागात शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनचालकांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून नारायणपेठेकडे यावे. केळकर रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठमार्गे इच्छितस्थळी जावे. मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सातनंतर बदल करण्यात येणार आहे. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले करुन दिली जातील.

Web Title : शिवजयंती 2026: पुणे में जुलूस के लिए यातायात परिवर्तन, मुख्य मार्ग प्रभावित

Web Summary : पुणे में शिवजयंती के जुलूस के कारण 19 फरवरी को यातायात परिवर्तन। शिवाजी रोड, बाजीराव रोड और लक्ष्मी रोड जैसे प्रमुख मार्ग प्रभावित होंगे। जुलूस हुतात्मा चौक से शुरू होकर शिवाजी प्रिपरेटरी मिलिट्री स्कूल में समाप्त होगा। सुबह 7 बजे से जुलूस खत्म होने तक बदलाव।

Web Title : Pune Traffic Changes for Shivjayanti 2026 Procession: Key Routes Affected

Web Summary : Traffic diversions in Pune on February 19th for Shivjayanti procession. Key roads like Shivaji Road, Bajirao Road, and Laxmi Road will be affected. The procession starts at Hutatma Chowk, concluding at Shivaji Preparatory Military School. Changes from 7 AM until procession ends.