A prize-winning monologue in Pune | पुण्यात पारितोषिक विजेत्या एकांकिकांची प्रेक्षकांसाठी मेजवानी 
पुण्यात पारितोषिक विजेत्या एकांकिकांची प्रेक्षकांसाठी मेजवानी 

ठळक मुद्देदाजीकाका गाडगीळ करंडक, लोकांकिका, सवाई, अशा स्पर्धेत प्रथम स्थान

पुणे: पुरुषोत्तम, सवाई, उत्तुंग, प्रबोधन, दाजीकाका गाडगीळ करंडक अशा सांघिक पारितोषिकासहित चाळीस वैयक्तिक पारितोषिके विजेत्या ' प्राणिमात्र ' आणि '३०० मिसिंग' या दोन एकांकिकांच्या प्रयोगांची मेजवानी प्रेक्षकांसाठी पाहावयास मिळणार आहेत. भरत नाट्य मंदिर येथे येत्या रविवारी (दि. १३ ) रात्री ९.३० वाजता हे प्रयोग सादर होणार आहेत. 
अभिनेता क्षितीश दाते दिग्दर्शित प्राणिमात्र एकांकिकेने २०१२ साली पुरुषोत्तम करंडक पटकावला होता. त्यानंतर उत्तुंग, प्रबोधन, अशा स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला आहे. तर दिग्दर्शन, अभिनय, काकाजी, सर्वोत्कृष्ट लाईट्स, म्युजिक, नैपथ्य अशी २१ वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत. 
यश रुईकर दिग्दर्शित एका परदेशी चित्रपटाच्या जादूगाराची कथा उलघडून दाखवणारे '३०० मिसिंग ' या एकांकिकेने २०१६ साली पुरुषोत्तम करंडक मिळवला होता. त्याबरोबरच दाजीकाका गाडगीळ करंडक, लोकांकिका, सवाई, अशा स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले आहे. दिग्दर्शन, अभिनय अशी  २० वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत.
 आम्ही सात वषार्पूर्वी एक वेगळ्या पद्धतीचे नाटक बसवण्याचा प्रयन्त केला. तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. प्राणिमात्र असे त्या नाटकाचे नाव. प्राणिमात्र हे माझ्यासाठी आणि आमच्या या संपूर्ण संघासाठीच आयुष्यातल एक महत्वाचं वळण आहे. २०१२ साली पुरुषोत्तम करंडक जिंकलेल्या या एकांकिकेला सात वर्षे झाली. शेवटचा प्रयोग करून अडीच वर्षे झाली. तरी तीच टीम उत्साहाने नाटक करण्यास सज्ज आहे. प्राणिमात्र हे मी आयुष्यात दिग्दर्शित केलेले आणि प्रणव बापट याने लिखाण केलेले पहिले नाटक आहे. आमच्या टीममधल्या कलाकारांचा उत्साह पाहता पुन्हा नाटक करण्यास तयार झालो आहे.  क्षितीश दाते, अभिनेता, दिग्दर्शक 


Web Title: A prize-winning monologue in Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.