शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वैद्यकीय सेवाही होणार विस्कळीत

By admin | Updated: March 23, 2017 04:40 IST

उच्च न्यायालयाने फटकारूनही ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरूच ठेवला आहे.

पुणे : उच्च न्यायालयाने फटकारूनही ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरूच ठेवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा देऊन आपल्या सर्व सदस्यांना बंदचे आवाहन केले आहे. यामुळे पुण्यातील खासगी वैद्यकीय सेवाही विस्कळीत होण्याची भीती आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरू केला आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने मंगळवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सुरक्षेबाबत भीती वाटत असेल तर राजीनामा द्या,’ असे सांगत न्यायालयाने निवासी डॉक्टरांना फटकारले. संप तातडीने मागे न घेतल्यास उच्च न्यायालयाचा अवमान केल्याने संबंधित निवासी डॉक्टरांवर नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे ससूनला देण्यात आले होते. त्यानुसार, रात्री ८ वाजेपर्यंत कामावर रुजू न झाल्यास अभ्यासक्रम नोंदणी रद्द करण्याची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ससूनतर्फे निवासी डॉक्टरांना देण्यात आला. त्यानंतर रात्री नोटिसा मिळाल्यावर १०५ डॉक्टर पुन्हा रुजू झाले. बुधवारी दुपारनंतर वातावरण पुन्हा चिघळल्याने रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा काम थांबविले. त्यामुळे एकूण २७२ निवासी डॉक्टरांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. रुग्णालय प्रशासनासह रात्री उशिरापर्यंत बैैठका सुरू होत्या.ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ससून रुग्णालयातील सेवा सुरू ठेवण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३४ प्राध्यापक व १०० सहयोगी प्राध्यापक कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे तातडीच्या वैद्यकीय सेवेवर परिणाम होणार नाही. (प्रतिनिधी)