खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल

By अजित घस्ते | Updated: May 10, 2025 18:30 IST2025-05-10T18:29:54+5:302025-05-10T18:30:47+5:30

​​​​​​​परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी

Private market and direct market facilities should be inspected: Marketing Minister Jayakumar Rawal | खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल

खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त १०५ खासगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खासगी व थेट बाजाराबाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत. खासगी बाजारात खरेदी-विक्री शेड, बाजार ओटे, गोडाऊन, रस्ते यासह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या.

परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच बाजारात व्यवहार पारदर्शक नसलेल्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसेच सर्व खासगी व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

गुलटेकडी मार्केट यार्ड पणन कार्यालयात पणन संचालनालयाची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन संचालक विकास रसाळ, उपसंचालक मोहन निंबाळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर आदी उपस्थित होते.

यावेळी रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने देण्यात यावे. तसेच शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवानाधारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा, शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची त्यांना माहिती व्हावी. यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Private market and direct market facilities should be inspected: Marketing Minister Jayakumar Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.