पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजजवळ खासगी बसला अपघात, 2 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 10:06 IST2018-01-05T10:06:32+5:302018-01-05T10:06:54+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज येथील भराव पुलावर शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजजवळ खासगी बसला अपघात, 2 जणांचा मृत्यू
उंब्रज ( सातारा ) - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज येथील भराव पुलावर शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. या अपघातावेळी ट्रॅव्हल्सनं दोन महिला व तीन महाविद्यालयीन तरुणांना उडवलं. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एक महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून कोल्हापूर दिशेने भरधाव येणा-या ट्रॅव्हल्सच्या (एम-एच-०३ सी पी १४७३) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी उंब्रज बस स्थानकासमोर महामार्गावर कराडकडे जाण्यासाठी थांबलेल्या 5 जणांना ट्रॅव्हल्सने उडवले. या भीषण अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जखमी झाले.
यानंतर ट्रॅव्हल्स 100 मीटर अंतरावर जाऊन दुभाजकाला जाऊन धडकली. यात चालकाचाही मृत्यू झाला. चालकाचा मृत्यू अपघातामुळे झाला की हृदयविकाराच्या झटक्यानं, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. सुदैवानं सर्वजण सुखरुप आहेत.