पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:49 IST2025-04-26T11:48:38+5:302025-04-26T11:49:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी याकरिता गणराया चरणी प्रार्थना नड्डा यांनी यावेळी केली आहे

Prime Minister narendra Modi should give a befitting reply to the terrorists of Pahalgam J. P. Nadda at the feet of Dagdusheth Ganpati | पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पुणे: आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा असल्याचे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा 'दगडूशेठ' गणपतीला अभिषेक केला. 

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो... सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो... परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो... देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो... असा संकल्प त्यांनी यावेळी केला आहे. दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली. 

जे. पी. नड्डा म्हणाले, पहलगामच्या या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ६ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यात पुण्यातील २, पनवेलमधील १ आणि डोंबिवलीतील ३ मावस भावंडांचा समावेश आहे. सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली. यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. 

Web Title: Prime Minister narendra Modi should give a befitting reply to the terrorists of Pahalgam J. P. Nadda at the feet of Dagdusheth Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.