शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

पंतप्रधान मोदी यांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:57 PM

भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुणे : नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर एक कोटी ४५ लाख कोटींची करसवलत जाहीर केली आहे. यामुळे हा पैसा अर्थचक्रात उपलब्ध होवून नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुण्यात आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय संघटनमंत्री व्हि.सतिश, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, यांच्यासह पुणे भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे आदी मान्यवर  उपस्थित होते.  

पुढे ते म्हणाले की, मूळचे पश्‍चिम पाकिस्तानातील असलेले इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग हे पंतप्रधान तर लालकृष्ण आडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान बनू शकले, परंतू कलम ३७० मुळे जम्मू- कश्मिरमधील मुळच्या गुज्जर, बकरवाल समाजाला आरक्षणाअभावी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधीत्व करता येत नव्हते. हे कलम हटविल्याने आता जम्मू कश्मिरच्या विधानसभेत आणि संसदेत या समाजाचे प्रतिनिधी दिसतील. कश्मिरच्या महिलांना बाहेरील राज्यात लग्न केल्यानंतरही मालमत्तेत अधिकार मिळणार आहे. आतापर्यंत देशातील बहुतांश कायदे तेथे लागू होत नव्हते, ते यापुढे लागू होतील. तीन तलाक बील मंजूर केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.पाच वर्षापुर्वी महाराष्ट्राचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. घराणेशाही, सत्तेतून पैसा यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. सरकार स्थिर नसल्याने राज्याची पिछेहाट झाली होती. परंतू फडणवीस यांच्या नेतृत्वाने शेती, शिक्षण, आरोग्य, परकिय गुंतवणुकीत राज्याला वरच्या स्थानावर आणले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस