पुणे: नका करू दुजेपणा, तृतीय पंथीयांनाही आपले म्हणा, प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, आता नाही तर मग कधी ३७७ बदला आधी, अशी घोषवाक्ये घेऊन ४५० तृतीयपंथीयांनी अभिमान पदयात्रेत रविवारी सहभाग घेतला होता.समपथिक ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या अभिमान पदयात्रेत गे, बायसेक्शुअल, तृतीयपंथी, इंटरसेक्स तरुण सहभागी झाले होते. या पदयात्रेचा मुख्य उद्देश हाच होता की समाजाने तृतीयपंथीयांना स्वीकारावे तसेच कायद्याने ट्रान्स जेंडरला परवानगी दिल्यामुळे त्याचे स्वागतही या पदयात्रेत करण्यात आले. अशी माहिती समपथिक ट्रस्टचे ट्रस्टी तिनेश चोपडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}