Pune Crime| पोलीस असल्याची बतावणी करून लाॅजमध्ये तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 08:23 IST2022-09-16T08:23:13+5:302022-09-16T08:23:55+5:30
सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली...

Pune Crime| पोलीस असल्याची बतावणी करून लाॅजमध्ये तपासणी
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून लाॅजमधील रजिस्टर तपासले. तसेच सुरक्षारक्षकाला मारहाण केली. योगीराज लाॅज, देहूफाटा आळंदी देवाची येथे बुधवारी (दि. १४) दुपारी चार ते साडेचार या वेळेत ही घटना घडली.
राम अरुण काळे (वय २४, रा. आळंदी देवाची, ता. हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रल्हाद रामदास तांदळे (वय ३४, रा. गुंजाळवस्ती, वारजे माळवाडी), छाया प्रल्हाद खैरणार (वय ३७), प्रथमेश राजेश जोशी (वय २०), विजय विद्यानंद धोत्रे (वय १९), अंकिता विद्यानंद धोत्रे (वय २२, चौघेही रा. सिंहगड रोड, जाधवनगर, पुणे) यांच्यासह १७ वर्षीय मुलीवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या लाॅजमध्ये आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. लाॅजमधील सर्व रजिस्टर चेक केले. तसेच लाॅजमधील इसमांकडे चौकशी केली. त्यानंतर लाॅजमधील वाॅचमन मधुकर मोहटे यांना हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.