शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टोलवसुली बंद पाडण्याची तयारी

By admin | Updated: June 8, 2015 05:26 IST

ठेकेदाराकडून बाजूपट्ट्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू केल्याने देहूरोडच्या नागरिकांनी हरकत घेत शनिवारी सदर काम थांबविले होते

किवळे : मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यान संरक्षक बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण चार दिवसांत करण्याबाबत बैठकीत इशारा देऊनही ठेकेदाराकडून बाजूपट्ट्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू केल्याने देहूरोडच्या नागरिकांनी हरकत घेत शनिवारी सदर काम थांबविले होते. रस्ते विकास महामंडळाने संबंधित कामे सुरु करण्याबाबत पत्र देऊनही सदर रस्त्याच्या कामाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. चार दिवसांची मुदत देऊनही काम न केल्याने सोमाटणे येथील टोलवसुली आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली थांबविण्याची तयारी देहूरोडकरांनी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत ३ जूनला देहूरोड येथील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व देहूरोडचे नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत आमदार भेगडे यांनी निगडी ते देहूरोड दरम्यानच्या संरक्षक बाजू पट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून सोमवारपर्यंत पूर्ण करावे अन्यथा सोमाटणे येथील टोलवसुली थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी संबंधित रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या ठेकेदार कंपनीला (म्हैसकर इन्फ्रा. प्रा. लि. ) ५ जूनला पत्र पाठवून निगडी ते देहूरोड संरक्षक बाजूपट्ट्यांचे निविदा तरतुदीनुसार दुरुस्ती करण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. (वार्ताहर)शनिवारी दुपारी संबंधित ठेकेदाराने देहूरोड येथे रस्त्याच्या बाजूपट्ट्या मजबुतीकरण न करता तात्पुरती कामे करण्यास सुरुवात केली होती. मात्र ही बाब लक्षात येताच विशाल खंडेलवाल, मलंग मारिमुत्तू, रघुवीर शेलार, तसेच अंजनी बत्तल, विनायक काळे, दिनेश श्रीवासन आदी नागरिकांनी सदर काम थांबविण्यास भाग पाडले.