शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या स्वागतासाठी नियोजन आराखडा तयार

By admin | Updated: June 9, 2015 05:33 IST

लाखो भाविक-भक्त व यात्रेकरूंना मूलभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे.

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा प्रस्थान ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोहळा होणार आहे. त्यानिमित्त आळंदीत येणाऱ्या लाखो भाविक-भक्त व यात्रेकरूंना मूलभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून, पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी न. प. प्रशासन सज्ज झाले आहे.यात्रा नियोजनासाठी नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, वसुली विभाग, विद्युत विभाग, संरक्षण विभाग असे विभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. त्या त्या पथकासाठी नियुक्त कर्मचारी त्या त्या विभागाचे काम व जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणार आहेत. नियंत्रण कक्षासाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यात्रा काळात नियुक्त सर्व विभागाची समन्वय राखण्याची भूमिका बजावण्यात येणार आहे. याच विभागामार्फत सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती ठेवणे, यात्रेसंबंधी पत्रव्यवहार करणे, वारकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी व सूचनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत खेड तालुका हद्दीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येणार आहे, तर हवेली तालुक्याच्या हद्दीमध्ये ‘वाय’ जंक्शनला आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येणार आहे. या कक्षात विविध सूचनांचे फलक लावण्यात येणार असून, भाविकांना सूचना देण्यासाठी स्पीकरची सोय करण्यात येणार आहे. (वार्ताहर)४सुरक्षेसाठी ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था. ४पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध व्हावा, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे यासाठी आळंदी व दिघी पोलिसांकडे संपर्क. ४अन्न, औषध-भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने अन्नपदार्थ विक्रेत्यांना ‘ना हरकत’ देताना न.प.ची ‘ना हरकत’ घ्यावी. ४पाटबंधारे विभागाने इंद्रायणी पात्रात पुरसे पाणी सोडावे. ४महसूल विभागाने यात्राकाळात रॉकेल, स्वस्त धान्य व गॅस पुरवठ्याची सोय करावी. ४शहरात वारकऱ्यांसाठी पुरेशा शौचालयांची सोय करण्यात आली असून, नागरिक व वारकऱ्यांसाठी ही शौचालये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पैसे मागणी केल्यास संपर्क साधावा.