शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रवीण दरेकरांची नगरसेवक होण्याची लायकी नाही; ते विरोधी पक्षनेते झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 8:04 PM

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केले जोडे मारो आंदोलन

ठळक मुद्देलवकरात लवकर माफी मागावी. अन्यथा आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ

पुणे : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महिला चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद आता पुण्यातही उमटू लागले आहेत.  

 त्या विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रविण दरेकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “काल एका कार्यक्रमात महिलांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. दरेकर यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत,” अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला.

“प्रविण दरेकर हे २००९ साली मनसेच्या आणि नंतर च्या भाजपच्या लाटेत आमदार झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तिने बोलताना भान ठेवून बोलावे. जर त्यांनी येत्या ४८ तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही तर महिला राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जगताप यांनी दिला.

आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ :- राष्ट्रवादी महिलांचा इशारा 

“आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असताना. प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी. अन्यथा आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ,” असा इशारा राष्ट्रवादीच्या महिलांनी दरेकर यांना दिला.

टॅग्स :Puneपुणेpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिला