राज्यभरात १५ फेब्रुवारीपासून एमएस-सीआयटी केंद्रांवर ‘प्रज्ञाशोध’ परीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:11 IST2026-02-12T15:11:01+5:302026-02-12T15:11:18+5:30

‘भाषा’ संस्थेतर्फे गेली बारा वर्षे घेतल्या जाणाऱ्या ‘मराठी भाषा ऑलिम्पियाड’ परीक्षेची ही दुसरी, वरिष्ठ पातळी आहे.

'Pragnyashodha' exam to be held at MS-CIT centers across the state from February 15 | राज्यभरात १५ फेब्रुवारीपासून एमएस-सीआयटी केंद्रांवर ‘प्रज्ञाशोध’ परीक्षा 

राज्यभरात १५ फेब्रुवारीपासून एमएस-सीआयटी केंद्रांवर ‘प्रज्ञाशोध’ परीक्षा 

पुणे : ‘भाषा’ संस्था व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा प्रज्ञाशोध’ ही राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा राज्यभरातील अधिकृत एमएस-सीआयटी केंद्रांवर रविवार, दि. १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी पाच यावेळेत होणार आहे. मराठी भाषेतील प्रावीण्य शोधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असण्याची माहिती

‘भाषा’ संस्थेतर्फे गेली बारा वर्षे घेतल्या जाणाऱ्या ‘मराठी भाषा ऑलिम्पियाड’ परीक्षेची ही दुसरी, वरिष्ठ पातळी आहे. पहिल्या लेखी फेरीत उत्तीर्ण झालेल्या इयत्ता पाचवी ते नववीतील प्रथम, प्रावीण्य व विशेष प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांनाच या डिजिटल परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून संगणकावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

राज्यभरातील विद्यार्थ्यांचे केंद्रनिहाय मॅपिंग पूर्ण झाले असून, संबंधित एमएस-सीआयटी केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना वेळापत्रक व इतर सूचना दिल्या जात आहेत. गोवा व बेळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या लेखी आणि दुसऱ्या डिजिटल फेरीतील गुणांची सरासरी काढून प्रत्येक इयत्तेतील दहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र दिले जाईल, तर गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title : महाराष्ट्र में एमएस-सीआईटी केंद्रों पर 'प्रज्ञाशोध' परीक्षा 15 फरवरी से

Web Summary : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड और 'भाषा' संस्था 15-22 फरवरी तक एमएस-सीआईटी केंद्रों पर 'मराठी भाषा प्रज्ञाशोध' परीक्षा आयोजित करेंगे। यह परीक्षा मराठी भाषा ओलंपियाड के पहले लिखित दौर में उत्तीर्ण छात्रों के लिए है। शीर्ष छात्रों को ट्रॉफी और प्रमाण पत्र मिलेंगे।

Web Title : Maharashtra to Hold 'Pradnyashodh' Exam at MS-CIT Centers

Web Summary : Maharashtra Knowledge Corporation Limited and 'Bhasha' Sanstha will conduct 'Marathi Bhasha Pradnyashodh' exam from February 15-22 at MS-CIT centers. The exam is for students who passed the first written round of the Marathi Bhasha Olympiad. Top students will receive trophies and certificates.