शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद; अत्यावश्यक कामांमुळे पुरवठा खंडित राहणार

By नितीन चौधरी | Updated: February 4, 2025 20:43 IST

मेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांमुळे पुरवठा खंडित राहणार

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणेमेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. ६) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. वीज बंदच्या कालावधीबाबत संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजMetroमेट्रो