शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
3
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
4
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
5
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
6
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
7
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
8
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
9
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
10
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
11
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
12
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
14
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
15
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
16
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
17
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
18
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
19
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
20
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता येते आणि जाते; मात्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे पद - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:27 IST

निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली असल्याने, समविचारी पक्षासोबत युती करून टाका असे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले.

फुरसुंगी : सत्ता येते आणि सत्ता जाते. मात्र मला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची मनात असलेली खदखद रविवारी (दि. २३) फुरसुंगी येथे बोलून दाखवली.

फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी शिवसेना उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले की, आपण मुख्यमंत्री झाल्यावर फुरसुंगी-उरुळी गाव येथील महापालिकेच्या अवाजवी करामुळे नगरपरिषद करण्यात आले. अडीच वर्षांच्या कालावधीत बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली. मी टीकेला टिकेतून उत्तर न देता कामातून उत्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतला. आमदार विजयबापू शिवतारे यांनी त्यासाठी आग्रही मागणी केली होती, कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण करून स्थानिक नागरिकांचा १२ पट कराच्या बोज्यातून आम्ही मुक्तता केली. तसेच या भागाचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ज्यांनी या दोन्हीला विरोध केला त्यांना आता तुमची मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.  तसेच उर्वरित भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी १०० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यावर नक्की मंजुरी देण्यात येईल असे नमूद केले. फुरसुंगीची भाजी मंडई आणि क्रीडा संकुल देखील आपण मंजूर केले आहे, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी १०३ कोटी रुपये दिले असल्याचे सांगितले. लवकरात लवकर या नगर परिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास आराखडा अंतिम करावा असेही याप्रसंगी सांगितले. 

समविचारी पक्षासोबत युती करा 

लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण एकत्र लढलो असल्याने व भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली असल्याने, समविचारी पक्षासोबत युती करून टाका असे निर्देश यावेळी दिले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Power comes and goes; being a brother is bigger: Shinde.

Web Summary : Eknath Shinde expressed his feelings about the Chief Minister's position at Fursungi. He highlighted development works in the Fursungi-Uruli area, including water supply schemes and infrastructure projects. He urged support for aligned parties in upcoming elections.
टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार