शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव-पैसा फंड रस्त्यावर खड्डेच खड्डे

By admin | Updated: June 18, 2015 23:39 IST

वडगाव-पैसाफंड रस्त्यावर अगणित खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

वडगाव मावळ : वडगाव-पैसाफंड रस्त्यावर अगणित खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरुन चालताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून विद्यार्थी, कामगार व नागरिकांचे अपघात होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.हा रस्ता विकास प्रकल्प क्षेत्रात असून, वडगाव व तळेगाव दाभाडे या शहराला जोडणारा जवळचा आहे. या रस्त्यालगत मंगल कार्यालय, शाळा, गृहप्रकल्प व औद्योगिक कारखाने असल्याने रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. रस्त्याचे खड्डे पडून रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे साचले असून वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी वाहने जाताना टायरखालून दगड उडून पादचाऱ्यांना लागल्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था वाढत आहे. विशाल लॉन्सजवळच्या ओढ्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याने तेथे रस्ता धोकादायक झाला आहे. रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी लग्न समारंभाच्या वेळी वाहतूककोंडी होते.रस्त्यावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नाल्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहते . त्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येते. चालताना नागरिक पाय घसरून पडत आहेत. शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घसरुन पडल्याने दुखापती होत आहेत. माऊंट सेंट शाळेजवळ रस्त्यालगत अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला असल्याने एकावेळी दोन वाहनांची ये-जा होत नाही. या रस्त्याच्या एका बाजूला खड्डा असल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. रस्त्यातील अतिक्रमण हटवून दुतर्फा नाला करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस अतुल वायकर, विशाल वहिले, प्रकाश वहिले, रोहिदास म्हाळसकर, गणेश गवारी, प्रमोद वहिले व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)