शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 00:10 IST

३६५ दिवसांपैकी हवेतील अतिसुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण समाधानकारक

ठळक मुद्देशहरात प्रति व्यक्तिमागे आहे एकपेक्षा अधिक झाडे

पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणामध्ये घट झाली असून पर्यावरणावर त्याचा सकारात्मक बदल झाला. शहरातील हवा, पाणी व ध्वनी या घटकांच्या प्रदूषणाची लॉकडाऊन काळातील पातळी मोजण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान या सर्व घटकांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकापेक्षा कमी झाल्याचे पालिकेच्या पर्यावरण विषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ३६५ दिवसांपैकी हवेतील अतिसुक्ष्म धुलिकणांचे (पी. एम. २.५) प्रमाण हे १५६ दिवस समाधानकारक, १४९ दिवस चांगले, ५९ दिवस मध्यम स्वरूपाचे होते. तर केवळ १ दिवस हे प्रमाण खराब होते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासोबतच हरितक्षेत्र वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन, बायोमिथेनायझेशन, वेस्ट टू एनर्जी, इंसिनरेशन इ. सारखे प्रकल्प, ईबेस्ट, बायो-मेडिकल वेस्ट, गार्डन वेस्टचे संकलन, अपारंपरिक उर्जेचा वापर-सौरऊर्जा, गांडूळखत आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या मिळकतींना सवलत, यासोबतच स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्या, सौर उर्जेचा वाढता वापर आदी बाबींचा समावेश या अहवालात करण्यात आला आहे. ----///---- शहरात २०१९ मध्ये सर्वात जास्त तापमान २९ एप्रिल रोजी ४३ डिग्री सेंटीग्रेड, तर सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५.१ डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदविले गेले. तसेच मागील तीन दशकात सन २०१९ मध्ये सर्वात जास्त १४११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. --------शहरात प्रति व्यक्तिमागे आहे एकपेक्षा अधिक झाडेशहरात तब्बल ४१ लाख ९४ हजार ६२३ झाडे असल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. झाडांच्या ४१८ प्रजाती नमूद करण्यात आल्या असून गिरिपुष्प या झाडाची संख्या सर्वांधिक आहे. दुर्मिळ वृक्षांची संख्या १११ आहे. तर सर्वात मोठे झाड वडाचे असुन ते १२०२ सेंटीमीटर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहराच्या ३५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची गणना अधिक भरली आहे.

पालिकेने शहरातील वृक्षांची गणना करण्यासाठी जीपीएस-ग्लोबल पोेझिशनिंग सिस्टिम आणि जीआयएस -जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम यांसारख्या प्रणालीचा वापर केला आहे. झाडांच्या स्थानांची अचूक माहिती तसेच एकूण संख्या आदी घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील ग्रीन कव्हर चांगले असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरण