शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोर्शे कार अपघात प्रकरण: आई आजरी आहे,जामीन द्या;विशाल अग्रवालचा जामीन अर्जावर कोर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:36 IST

आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे.

पुणे :पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला. गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याचे गांभीर्य, शिक्षेची तीव्रता, खटल्याद्वारे आधारलेल्या सामग्रीचे स्वरूप, साक्षीदारांशी छेडछाड करण्याची वाजवी भीती आणि जनतेच्या हितसंबंधांचा विचार करता, या टप्प्यावर आरोपीला तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे कोणतेही न्यायिक कारण दिसत नाही, असे नमूद करीत अर्ज नामंजूर केला.कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे.

विशाल अग्रवाल यानेही आई आजारी असल्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, जामीन अर्जावर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. आरोपीचे वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मेहुणे आरोपीच्या आईची काळजी घेऊ शकतात. अर्जदार आरोपीकडून खटल्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मागितल्याप्रमाणे तात्पुरता जामीन मंजूर केल्याने खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा तर बचाव पक्षाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अर्ज मंजूर करण्याचा विचार करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :PuneपुणेPorscheपोर्शेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड