शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
3
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
4
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
5
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाज भारतात पोहचले; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
6
Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
7
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
8
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
9
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
10
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
11
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
12
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
13
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
14
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
15
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
16
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
17
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
18
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
19
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
20
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Porsche accident case : मुलाला दारूच्या नशेत बघणारे साक्षीदार आणि पुरावे;विशेष सरकारी वकील हिरेंची बाल न्याय मंडळात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:58 IST

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद बाल न्याय मंडळात पूर्ण झाला आहे. येत्या १५ जुलैला मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे :पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलावर ‘प्रौढ’ म्हणून खटला चालवायचा की नाही यावर बालन्याय मंडळात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मुलगा हा सात वाजल्यापासून दारूच्या नशेत होता. त्याला दारूच्या नशेत बघणारे काही साक्षीदार आहेत. कार चालवण्यापूर्वी चालकाने त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही. शिवाय पालकांनी ससूनमध्ये मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले हा गंभीर गुन्हा असून, मुलाला प्रौढ म्हणून वागणूक दिली जावी असे बाल न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद बाल न्याय मंडळात पूर्ण झाला आहे. येत्या १५ जुलैला मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात कार चालवून दोन अभियंत्यांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, या मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. या अर्जावर बाल न्याय मंडळात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद केला की अल्पवयीन मुलावर आयपीसी कलम ३०४ आणि ४६७ सह जेजे ॲॅक्ट कलम २ (३३) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कलम ३०४ मध्ये १० वर्षे शिक्षा तर ४६७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे. हा गंभीर गुन्हा असल्याने त्याला प्रौढ म्हणून वागवायला हवे.

त्याला विधिसंघर्षित बालकाचे वकील प्रशांत पाटील यांनी विरोध दर्शविला. पाटील यांनी शिवानी मित्तल विरुद्ध एनसीटी ऑफ दिल्लीचे सायटेशन वाचून दाखविले. विधिसंघर्षित मुलाचे पुनर्वसन करणे आवश्यक असते. अपघातामागे मुलाचा गुन्हेगारी हेतू नव्हता. त्याचे केवळ कार चालविताना जजमेंट चुकले. मुलगा लहान आहे. त्याच्या शिक्षण आणि करिअरचा प्रश्न आहे. कलम ३०४ मध्ये कमीत कमी शिक्षा सांगितलेली नाही. १८ वर्षांच्या आतील मुलाला अल्पवयीन म्हणूनच वागणूक द्यावी लागते. त्यामुळे पोलिसांचा अर्ज रद्द करावा. दरम्यान, या अर्जावर आता १५ जुलै रोजी बाल न्याय मंडळ निकाल देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेPorscheपोर्शेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड