Porsche Accident Case :रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांवर मोठी कारवाई; पुणे पोलिसांचे मेडिकल कौन्सिलकला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:10 IST2025-03-27T19:09:53+5:302025-03-27T19:10:07+5:30

Porsche Accident Case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Porsche Accident Case Cancel medical license of doctor who swapped blood samples Pune Police letter | Porsche Accident Case :रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांवर मोठी कारवाई; पुणे पोलिसांचे मेडिकल कौन्सिलकला पत्र

Porsche Accident Case :रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांवर मोठी कारवाई; पुणे पोलिसांचे मेडिकल कौन्सिलकला पत्र

किरण शिंदे

Porsche Accident Case ( Marathi News ) :  काही दिवसापूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता. हे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणात पोलिसांसह डॉक्टरांनीही आरोपीला मदत केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आज पुणे पोलिसांनी पोलिसांसह डॉक्टरांवरही मोठी कारवाई केली आहे. पोर्शे कारचा अपघात झाला त्यावेळी ससुन रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचा नमुन्याची अदला बदल केल्याचे उघड झाले होते.

 ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणातील डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा अशा मागणी पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे दिले आहे.  ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयी कारचालकाच्या रक्ताची अदलाबदल केली होती. यावर आता कारवाईची मागणी केली आहे.

पोर्शे अपघात प्रकरण : 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार ? 

अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचं रक्त तपासणीसाठी घेतले होते. या प्रकरणात दोशी ठरल्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. मागील दहा महिन्यापासून दोघेही डॉक्टर तुरुंगात आहेत.

या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे पत्राद्वारे केली आहे. याच प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे.

दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

याच अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होते. आणि आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे. कारण या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे. 

पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कर्तव्यास असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानूसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Web Title: Porsche Accident Case Cancel medical license of doctor who swapped blood samples Pune Police letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.