मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गंभीर गुन्ह्याची उकल, अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचार झाला उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 21:53 IST2021-12-22T21:52:26+5:302021-12-22T21:53:22+5:30
सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर शिंदे हा तळजाई पठार परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्याच्या मोबाईलमध्ये दोन व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची क्लिप आढळून आली होती.

मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गंभीर गुन्ह्याची उकल, अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचार झाला उघड
पुणे- पुण्यातील तळजाई पठार परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ क्लिप आढळली. या क्लिपवरून तीन जणांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ईश्वर शिंदे (वय 20), कुणाल भांगरे (वय 19) आणि निलेश नेटके (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे जिल्ह्या ग्रामीण भागात हा गुन्हा घडल्याने हवेली पोलीस स्टेशनकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर शिंदे हा तळजाई पठार परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्याच्या मोबाईलमध्ये दोन व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची क्लिप आढळून आली होती. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ही क्लिप त्यानेच रेकॉर्ड केल्याचे सांगितले. सहकारनगर पोलिसांनी पीडित मुलाचा शोध घेतला. त्यानंतर या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही तरुणांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
आरोपींनी यावर्षी दिवाळीच्या कालावधीत या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने आरोपी आणि हा गुन्हा हवेली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.