'राज्यात प्रदूषण वाढतंय, नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:26 PM2021-09-29T14:26:40+5:302021-09-29T14:44:35+5:30

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत आहे.

Pollution is increasing in the state citizens should give priority to electric vehicles Aditya Thackeray | 'राज्यात प्रदूषण वाढतंय, नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं'

'राज्यात प्रदूषण वाढतंय, नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं'

Next
ठळक मुद्देइलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर विकत घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणार

पिंपरी : राज्यात प्रदूषण वाढत आहे. ते रोखण्यासाठी राज्य सरकारनं इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी आणली आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.  पिंपरी - चिंचवड शहराच्या दौ-यावर पर्यावरण मंत्री ठाकरे होते. त्यांनी चिंचवड एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भेट दिली.

 ठाकरे म्हणाले,  लोकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी महाराष्ट्राने धोरण जाहीर केले आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणा-या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत असून त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने उत्पादन केले जाते.

उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू, किती लोक इलेक्ट्रिक वाहने घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात आहे. राज्यात प्रदूषण वाढत आहे. त्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Pollution is increasing in the state citizens should give priority to electric vehicles Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.