शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ डोस आता मिळणार इंजेक्शनद्वारे

By admin | Updated: August 21, 2015 02:31 IST

पोलिओचा तोंडातून देण्यात येणारा डोस आता इंजेक्शनद्वारे देणे शक्य होणार आहे. राज्यभरात जानेवारी २०१६ पासून इंजेक्टेबल पोलिओ लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे

पुणे : पोलिओचा तोंडातून देण्यात येणारा डोस आता इंजेक्शनद्वारे देणे शक्य होणार आहे. राज्यभरात जानेवारी २०१६ पासून इंजेक्टेबल पोलिओ लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे. आरोग्यविभागातर्फे सुरुवातीला राज्यातील काही ठिकाणीच ही लस उपलबध होणार आहे. त्याची चाचणी घेऊन मगच पुढील आराखडा ठरविण्यात येणार असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. पोलिओची लस तोंडावाटे देण्यावरही काही मर्यादा आहेत. पोलिओचे संपूर्ण निर्मूलन झाल्यानंतरही काही काळ तोंडावाटे लस दिल्यास पुढे पोलिओचे विषाणू आपले स्वरुप बदलून त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे जगातील प्रगत देशांमध्येही आता तोंडावाटे लस देण्यापेक्षा पोलिओचे इंजेक्शन देण्यात येते. त्याच धर्तीवर भारतातही ही पद्धती अवलंबावी यादृष्टीने मागील बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांना योग्य तो मार्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सर्व प्रगत देशात इंन्जेक्शनद्वारेच पोलिओची लस देण्यात येते. पी १,पी२ आणि पी ३ या विषाणूंमुळे पोलिओची बाधा होते. या तिन्ही विषाणंूचा प्रतिकार करण्यासाठी इंजेक्टेबल पोलिओ लसीकरण अधिक फायदेशीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही पोलिओ इंन्जेक्शनचा पुरस्कार केला असून, त्याच्यातर्फे विविध स्तरावर जागृतीही करण्यात येत आहे. पुढील वर्षभरात महाराष्ट्रासोबत देशातील विविध राज्यांत पोलिओच्या इंजेक्शनची मोहिम राबविण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)