शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हाणामारी करणाऱ्या पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 01:46 IST2020-09-18T01:45:45+5:302020-09-18T01:46:42+5:30
पोलीस मुख्यालयात बुधवारी एक हवालदार व त्याचा सहकारी यांच्या कार्यालयीन कामावरुन वाद झाला होता.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हाणामारी करणाऱ्या पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी
पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करणाऱ्या त्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची गुरुवारी तडकाफडकी उचलबांगडी करुन त्यांना पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले.
पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी
एक हवालदार व त्याचा सहकारी यांच्या कार्यालयीन कामावरुन वाद झाला होता.तो वाद वाढून हवालदाराने सहकाऱ्याला मारहाण केली होती़ मुख्यालयातील भर रस्त्यावर झालेल्या या प्रकाराची चर्चा मुख्यालयात चांगलीच रंगली होती. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर गेला. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुरुवारी तातडीने या दोघांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.