पाेलिसांचे सेल्फी विथ अामिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 19:56 IST2018-08-11T19:53:20+5:302018-08-11T19:56:05+5:30

शुक्रवारी अभिनेता अामिर खान याने पुणे पाेलिस अायुक्तांची भेट घेतली. यावेळी अायुक्तालयातील पाेलिसांनाही अामिर साेबत सेल्फी घेण्याचा माेफ अावरला नाही.

police took selfie with aamir | पाेलिसांचे सेल्फी विथ अामिर

पाेलिसांचे सेल्फी विथ अामिर

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी त्याने सुमारे पाऊण तास चर्चा केली. 


    आमिर खान आयुक्तालयात आल्याची खबर मिळाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आमिर खान बाहेर पडताच अनेकांनी त्याच्याबरोबर छायाचित्र आणि सेल्फी काढून घेतले.  त्यानेही कोणतेही आढेवेढे न  घेता सर्वांना छायाचित्र काढण्याची संधी दिली.  आमिर खानच्या पानी फाउंडेशनचा कार्यक्रम बालेवाडी येथे रविवारी हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने ही भेट घेतल्याची चर्चा आहे. 

Web Title: police took selfie with aamir