शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

थापलिंग यात्रेत पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: January 6, 2015 22:58 IST

नवसाचे बैलगाडे पळविण्याच्या वादातून थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर/निरगुडसर : नवसाचे बैलगाडे पळविण्याच्या वादातून थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दगडफेकीत संजय बबन गिलबिले हे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्या डोळ्याला चार टाके पडले आहे. त्यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर दशरथ काचाळे (रा. पिंपळवंडी, जुन्नर) यांना पोलिसांनी उशिरा ताब्यात घेतले आहे.श्रीक्षेत्र थापलिंग येथील यात्रेला सोमवारी सुरुवात झाली. नवसाचे बैलगाडे पळविण्याची येथे परंपरा आहे. मात्र, बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने या वेळेची यात्रा शर्यतीविना पार पडली. पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बैलगाडे पळवू नका, असे आवाहन केले होते. परंतु त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. संभाव्य धोका ओळखून थापलिंग यात्रेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, ज्योती उमाळे तसेच २५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.नवसाचे बैलगाडे पळविण्यासाठी काही भाविक बैलगाड्यासह आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयाचा निकालाचा आदर ठेवून बैलगाडे पळवू नका, असे आवाहन केले. शर्यतीच्या घाटाच्या दोन्ही बाजूंना १० ते १२ हजार प्रेक्षक बसले होते. दीडच्या सुमारास घाटाच्या खालील बाजूला जमलेल्या लोकांपैकी १ बैलगाडा गर्दीतून पुढे आला. इतर लोकांनी बैलगाडे सुरू करण्यास आग्रह धरला, त्या वेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम व नागापूर ग्रामस्थांनी, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे; त्यामुळे शर्यती घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी जमलेल्या लोकांना समजावून सांगावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी घाटाच्या पायथ्याशी जमा झाले. नियमाप्रमाणे बैलगाडा शर्यत होऊ शकत नाही, असे आवाहन पोलिसांनी केले.ग्रामस्थांच्या मदतीने एक टॅ्रक्टर ट्रॉली घाटाच्या पायथ्याशी उभी करण्यात आली. तसेच पोलीस व्हॅन उभी करण्यात आली. जमलेल्या लोकांनी त्याला विरोध केला. विरोध करणाऱ्या लोकांना दूर करून पोलीस घाटात ट्रॉली लावत होते. घाटात लावण्यासाठी दुसरी ट्रॉली आणत असल्याचे पाहून शर्यती पाहण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी १०० ते १५० लोकांनी अचानक बेकायदा गर्दी जमवून ‘पोलीस बैलगाडा शर्यती बंद करीत आहेत, त्यांना तसा अधिकारी नाही. पोलिसांना घाटात थांबू देऊ नका’ असे म्हणून चारही बाजूंनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.एका इसमाने संजय बबन गिलबिले या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दगड मारला. त्या वेळी पोलीस अधिकारी तोरडमल यांनी दगडफेक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले.सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ दगड लागला आहे. तर, महिला पोलीस बोरकर यांच्या उजव्या तळहातावर दगड लागून जखमा झाल्याचे समजते. जखमी पोलीस कर्मचारी संजय बबन गिलबिले यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात सरकारी कामात जखमी करून अडथळा आणणे तसेच बेकायदेशीर जमाव जमवून दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर दशरथ काचाळे (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)सर्वाेच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने शर्यती भरवू नका, असे आवाहन केले होते. थापलिंग देवस्थान ट्रस्टीने सहकार्य केले होते. आजची परिस्थिती लगेच नियंत्रणात आली. प्रेक्षक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते; मात्र नागापूर ग्रामस्थांनी सहकार्य केले. नागरिकांनी संयम पाळावा.- मोहन जाधव पोलीस निरीक्षक मंचर पोलीस ठाणे