पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखाची फसवणुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:58 IST2025-07-08T19:57:45+5:302025-07-08T19:58:35+5:30
पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिस कर्मचाऱ्याने केली फसवणूक

पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखाची फसवणुक
पुणे - आपण क्राईम ब्रँचला पीएसआय असून पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून एक पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेची व तिच्या घरातील लोकांची १७ लाख ६४ हजार ८० रुपयाची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पोलिस कर्मचाऱ्यावर एक सराफाला फसवल्याप्रकरणी यापूर्वीच निलंबनाची कारवाई झाली आहे.
गणेश अशोक जगताप (रा. कावेरी नगर, पोलिस वसाहत, बिल्डींग नं. ३० वाकडेवाडी) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड येथील सोबा पार्कमधील एका ५१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान जगताप याने पोलिस कर्मचारी असतानाही फिर्यादी महिलेस आपण क्राईम ब्रँचला पीएसआय असल्याचे खोटे सांगितले. तसेच आपली मुलगी एमबीबीएस शिक्षण घेत असून आपल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे खोटे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीच्या आईकडून ७३.५ तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच फिर्यादी व त्यांच्या वडीलांकडून १७ लाख ६४ हजार ८० रुपये घेतले. त्यानंतर ही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहेत.
गणेश जगताप याच्यावर यापूर्वीही एका सराफ व्यवसायिकांने वरीष्ठ अधिकाऱ्याच्या नावे फसवणुक केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात जगताप याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.