शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आरक्षण बचावासाठी ओबीसींचा निघणारा मोर्चा पोलिसांनी दडपला ; भाजपाने फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 2:57 PM

सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता.

ठळक मुद्देराजकीय स्वरूप आल्याची टीका; भाजपाने फिरवली पाठ

पुणे: ओबीसी आरक्षण बचावासाठी गुरूवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार समीर भूजबळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व नेत्यांनाच पोलिसांनी शनिवारवाड्याजवळ ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यावर नेले. मोर्चाला राजकीय स्वरूप आले अशी टीका करत भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी प्रदेश अध्यक्षांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.

समीर भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता. त्यासाठी सगळे कार्यकर्ते शनिवार वाड्याजवळ जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, बापू भूजबळ,गजानन पंडित,नंदकुमार गोसावी,दयानंद इरकल, अजय पुंडे, माधवी देव यांसह अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी भूजबळ यांच्यासह सर्व नेत्यांना तिथेच ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यात आणले. त्यामुळे शनिवारवाड्याजवळ जमा झालेले आंदोलक गडबडले. उपस्थित पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही असे सांगत सर्वांना तिथून दूर केले. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणे पसंत केले. दरम्यान फरासखाना पोलिसांनीही नेत्यांना तुम्हाला गाडीतून तिथे नेण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे तेही पोलिसांच्या गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले.

तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन दिले. विधानपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीत व्यस्त असल्याने तिथे जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन देण्यात आले. त्यात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करावे अशा मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत.

सरकार आमचेच आहे, त्यामुळे आमच्या मागण्यांना नक्की न्याय मिळेल अशी भावना माजी आमदार चवधरी व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी व्यक्त केली. कायदा व सूव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, आम्ही त्यांना सहकार्य केले, आमचे म्हणणे आम्ही सरकारी प्रतिनिधींपर्यंत पोहचवले असे चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप आले असल्याची टीका केली. तिथे शरद पवार व राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फलक होते. त्यामुळेच आपण तिथे गेलो नाही. नियोजनाच्या बैठकीत तसे करायचे नाही असे ठरले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणPoliceपोलिसSameer Bhujbalसमीर भुजबळ