पाेलिसांनी पाठलाग करुन जप्त केली 350 लिटर दारु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 21:03 IST2019-08-12T21:02:06+5:302019-08-12T21:03:22+5:30

बकरी ईदनिमित्त पेट्राेलिंग करणाऱ्या पाेलिसांनी 350 लिटर हातभट्टीची दारु जप्त केली आहे.

police sized 350 ltr liquor | पाेलिसांनी पाठलाग करुन जप्त केली 350 लिटर दारु

पाेलिसांनी पाठलाग करुन जप्त केली 350 लिटर दारु

बिबवेवाडी : बिबवेवाडी येथील गंगा धाम चौकातून कोंढव्या च्या दिशेने जाणाऱ्या मारुती गाडी क्र. एम एच १४ एच ८२५६ या गाडीचा बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करून त्यामधून वाहून नेली जाणारी ३५० लिटर हातभट्टी दारू अंदाजे किंमत १७५०० रुपयाची दारू जप्त करून ताब्यात घेतली. 

बिबवेवाडी पोलिसांनी बकरी ईदच्या निमित्ताने पेट्रोलिंग व बंदोबस्त सुरू असताना गंगा धाम रस्त्यावरून कोंढव्याच्या दिशेने जोरात जाणाऱ्या मारुती गाडी ला चौकशीसाठी थांबण्यासाठी अडवले असता चालकाने घाबरून गाडी जोरात पुढे नेली. त्याच वेळी सहाय्यक पोलिस फौजदार रोहित शिंदे व पोलिस शिपाई पुजारी यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवून तपासणी केली असता या गाडीत वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक कॅन असल्याचे दिसून आले. या कॅन मध्ये हातभट्टी दारू असल्याचा संशय आल्याने गाडी चालक कृपाल किशन देव शर्मा (वय २६ रा.शेलारमळा कात्रज) याला ताब्यात घेऊन पोलिस पथक बोलावून पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

बिबवेवाडी पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत या पथकात सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता काळे, सहाय्यक पोलिस फौजदार विनायक शिंदे, पोलिस हवालदार रवी चिप्पा, पोलिस शिपाई अमित पुजारी यांनी चालकास पकडून तपास केला.

Web Title: police sized 350 ltr liquor