पोलिस भरतीमधील वाढीव जागांवरून वाद;अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:12 IST2026-02-10T14:12:03+5:302026-02-10T14:12:45+5:30
- मैदानी चाचणीपूर्वी हॉलतिकिटरांचा गोंधळ

पोलिस भरतीमधील वाढीव जागांवरून वाद;अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल
बारामती : राज्यात सुरु असलेल्या १५ हजारांहून अधिक पर्वाच्या पोलिस भरातीप्रक्रियेत मुंबई व पिंपरी-चिंचवडपोलिस दलाने अचारक जागांमध्ये वाढ केल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असले, तरी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात काही प्रवर्गाच्या जागा कमी केल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः भटक्या जमाती (ह) व विशेष मागास प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष उमेदवारांच्या जागा घटवण्यात आल्याने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.
अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे बदल करण्यात आल्याने उमेदवारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वीच जागांमध्ये बदल झाला असता, तर उमेदवारांना इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध झाला असता, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे, भटक्या जमाती (ह) व विशेष मागास प्रवर्गातील खेळाडू व प्रकल्पग्रस्तांसाठी आधी कोणत्याही त्यामुळे अनेक उमेदवारांनी पिंपरी-चिंचवडसाठी अर्जच केला नसण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या वाढीव आगांच्या जाहिरातीत या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा देण्यात आली असून, अर्जाची मुदत संपल्यानंतर हे बदल का? असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत.
बारामती येथील सहह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी सांगितले की, जागा वाहवणे ही निश्विताच सकारात्मक रात्मक बाब बाह आहे; मात्र भटक्या जमाती (ड) प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांसाठी पूर्वी ४ असलेल्या जागा नल्या जाहिरातीनुसार ३ करण्यात आल्या, तसेच विशेष मागास प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांच्या जागा ७ वरून १ करण्यात आल्या. या कपातीमुळे संबंधित प्रसर्गातील उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दि. ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी (शारीरिक) चाचणी सुरू होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही चाचणी दि. १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. याएबतची प्रसिद्धीपत्रके संबंधित जिल्द्वानी जाहीर केली असली, तरी मैदानी चाचणीला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही प्रतेशपत्रे (हॉलतिकीट) उपलब्ध न झाल्याने उमेदवार गोंधळात सापहले आहेत त्यामुळे भरतीप्रक्रियेचाबत तातडीने स्पष्टता आणण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.