पोलीस नाईक राहुल भागवत यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST2021-02-17T04:14:12+5:302021-02-17T04:14:12+5:30
शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस चौकी येथे काही दिवसांपासून ते काम पाहत आहे. सन २००८ मध्ये ते ...

पोलीस नाईक राहुल भागवत यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड
शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस चौकी येथे काही दिवसांपासून ते काम पाहत आहे. सन २००८ मध्ये ते पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले होते.त्यानंतर त्यांनी नागपूर येथे कमांडो ट्रेनिंग घेत काही वर्षे काम पाहिले.सन २०१६ मध्ये मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दिली होती.त्यात २०१९ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत त्यांची उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. मात्र पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुदद्यावरून नियुक्ती रखडली होती. यावर त्यांनी न थांबता सन २०१८ मध्ये पुन्हा मुख्य परीक्षा दिली व शारीरिक चाचणी अमरावती येथे २०२० मध्ये दिली. व त्याचा निकाल नुकताच लागला असून त्यात पुन्हा चांगल्या मेरिटमध्ये उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांनी झेप घेतली.