VIDEO| धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:26 IST2022-12-29T13:16:16+5:302022-12-29T13:26:38+5:30

हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता

Police nabbed those who were drinking alcohol and rioting near Sinhagad College in Pune | VIDEO| धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं

VIDEO| धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं

धायरी: वडगाव बुद्रुक आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता. त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार घडला आहे. 

मात्र सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गस्तीवर असेलल्या मार्शलला याबाबत काही कॉलेजच्या तरुणांनी हा प्रकार सांगितल्याने त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले. दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या या तरुणाने हातात कोयता घेऊन दहशत माजवित हे कृत्य त्याने केले. इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अक्षय इंगवले व धनंजय पाटील  या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: Police nabbed those who were drinking alcohol and rioting near Sinhagad College in Pune