शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खंडणीखोर पत्रकाराला पकडताना पोलिसांकडून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 21:42 IST

पोलिसांच्या अंगावर घातली गाडी, पाटसमधील घटना

पाटस, लोकमत न्यूज नेटवर्क: पुण्यातील व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन जीवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागणार्या तोतया पत्रकाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. दोघा खंडणीखोरांना खंडणी विरोधी पथकाने पकडले असून त्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे अशी त्यांची नावे आहेत. महेश सौदागर हनमे व दिनेश हनमे (दोघे रा. सोलापूर) अशी पकडलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका व्यावसायिकाला महेश हा पत्रकार असल्याचे सांगून खोट्या बतम्या देऊन बदनामी करतो, अशी ऑगस्ट २०२२ पासून धमकी देत होता. तसेच खोट्या पोलिस केसमध्ये अडकविण्याची धमकी देत होता. महेश याने फिर्यादीकडून आतापर्यंत ३ लाख ८० हजार रुपये खंडणी उकळली आहेत. तरीही तो सातत्याने खंडणी मागत होता. पैसे देतात म्हटल्याने त्याने त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यांना तातडीने ५० लाख रुपये घेऊन मोहोळ येथे बोलावले होते. याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांना त्याने आज लोणी काळभोर येथे बोलावले होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळ्याचे आयोजन केले. यवत टोलनाक्याजवळ सापळा रचला. फिर्यादी यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून यवतजवळ बोलावले. फिर्यादी यांच्याबरोबर गाडीत साध्या वेशात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण होते. हनमे याला संशय आल्याने त्याने फिर्यादींना खाली बोलावून घेत शिवीगाळ केली. त्याचवेळी दुसर्या एकाने गाडी चालू करुन पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाली उतरलेले चव्हाण यांनी बाजूला उडी मारत स्व:चा बचाव केला. आपल्याकडील पिस्टलमधून दोन गोळ्या टायरवर फायर केल्या. पळून जाणार्याना पकडताना सुरेंद्र जगदाळे हे जखमी झाले. पाठोपाठ आलेले पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव व सचिन अहिवळे, विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, पवन भोसले, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे यांच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडले.

याबाबत यवत पोलिसाना माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारी