शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद?

By admin | Updated: June 10, 2014 23:34 IST

पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे.

पुणे : पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांनी तक्रारींची दखल न घेतल्यास त्याविरूध्द नागरिकांना थेट दाद मागता यावी म्हणून गेल्या ५ वर्षापासून पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जनता दरबार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी ४ वाजता पोलीस आयुक्त स्वत: नागरिकांना भेटून त्यांच्या तक्रारी जाणून घेत असत. मात्र पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. नागरिकांना पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून व्यवस्थित वागणूक न मिळत असल्याच्या वारंवार तक्रारी पोलीस आयुक्तांकडे येत होत्या. यापार्श्वभुमीवर तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी जनता दरबार सुरू केला. त्यांची बदली झाल्यानंतर मीरा बोरवणकर व गुलाबराव पोळ यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवला होता. थेट आयुक्तांना भेटून आपले गार्‍हाणे मांडता येत असल्याने नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत होता. नागरिकांच्या तक्रार अर्जानुसार लगेच संबंधित पोलीस अधिकार्‍यास फोन शहानिशा केली जात होती. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत होती. पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्‍यांवर जनता दरबाराचा मोठा वचक निर्माण झाला होता. गुलाबराव पोळ यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदली झाल्यानंतर सतीश माथूर पुण्यात बदलून आले. मात्र त्यांनी जनता दरबारामध्ये सहभागी होणे टाळले आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जनता दरबारामध्ये तक्रारी ऐकूण घेण्याचे काम पोलीस उपायुक्त किंवा सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. त्यांच्या समकक्ष असणार्‍या अधिकार्‍यांबदद्ल नागरिकांनी तक्रारी केल्यास ते यास न्याय देऊ शकतील का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तसेच त्यामुळे जनता दरबाराचे महत्त्वच संपुष्टात आले आहे.दरबार राजाचा असतोपोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'जनता दरबार ही संकल्पनाच मला मान्य नाही, दरबार हा राजाचा असतो. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मी नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी उपलब्ध असतो. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे भेटून मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतो.'