शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

खळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 18:24 IST

पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पुणे : पोलीस कर्मचाऱ्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका गुन्हेगाराला अटक केली आहे.

योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसो लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१पासून आजपर्यंत हडपसर व दत्तवाडी परिसरात घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ हा सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हे शेजारी शेजारी रहायला होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. योगेश अडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच खूनाच्या गुन्ह्यातून पॅरोलवर सुटला होता. नितीन दुधाळ याने अडसुळ याची हडपसर येथे भेट घेतली. त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचारी यास मारहाण अथवा अपघात करुन गंभीर दुखापत करुन कायमचे अपंगत्व आणण्यासाठी व त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहीन, असे सांगितले. अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितले. तो जातो कोठे, कधी येतो, त्याच्याकडे काही हत्यार आहे, अशी माहिती काढण्यास सांगितले.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, दत्तवाडी पोलिसांना अशा प्रकारे सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन माहिती घेतली. त्याला अडसुळ याने १० हजार रुपये दिल्याचेही या गुन्हेगाराने सांगितले. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील या पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करुन त्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न कट रचल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी योगेश अडसुळ याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस नितीन दुधाळ याचा शोध घेत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसHadapsarहडपसरfaraskhana policeफरासखाना पोलीस