शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

विश्रांतवाडीत जुगारधंद्यावर धाड : वीस हजाराच्या "चिल्लरसह" रोख पावणेचार लाखाची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 9:14 PM

शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा करणार्‍या पोलिसांचा विश्रांतवाडी येथील जुगार अड्डयावरील मोठ्या कारवाईने पितळ उघडे पडले आहे.

पुणे - शहरातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसप्रमुख  आयुक्तांनी सर्व प्रभारी अधिकार्‍यांना आदेश दिलेले असताना विश्रांतवाडी परिसरातील अवैध धंदे खुलेआम सुरु होते. सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांनी केलेल्या येथील अवैध धंद्यावरील मोठ्या कारवाईत तब्बल पावणेचार लाखाची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. गंभीर बाब म्हणजे अवैध धंद्यामधील सराईत  तडीपार आरोपी गुंड्या उर्फ सूरज माचरेकर सह विनोद माचरेकर व प्रविण पालेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मोठ्या रेडमधून सराईत तडीपार आरोपी "गुंड्डया" व त्याचा भाऊ विनोद हे या मोठ्या कारवाईतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.विश्रांतवाडी भिमनगर परिसरातील सराईत तडीपार आरोपी गुंड्ड्या हा त्याच्या घरात अवैध मटका जुगार घेत असल्याची गोपनीय माहिती  सहाय्यक आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांना मिळाली होती.सहाय्यक निरीक्षक सुशिल बोबडे,उपनिरीक्षक एम.पी.भांगे यांच्यासह येरवडा, विमाननगर, चंदननगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली.

रेडमधून पोलिसांच्या हातावर तुरी देत या धंद्यांचा मुख्य सुत्रधार तडीपार गुन्हेगार गुंड्डया व त्याचा भाऊ विनोद फरार झाले.रायटर प्रविण पालेकर याला जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी पोलिसांनी जुगार अँक्टसह तडिपारीचा भंग केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी,पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांनी हि कारवाई केली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे  उखडणार - अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारीविश्रांतवाडी येथील मटका जुगार अड्ड्यावरील मोठ्या कारवाईची पोलिसांनी गंभीर दखल घेत याप्रकरणातील आरोपींची पाळेमुळे शोधून त्यांना  जेरबंद करण्याच्या सूचना संबधित विभागाचे अधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी यांनी दिली.यापुढिल काळात देखिल अवैध धंद्यावर सातत्याने धडक कारवाया सुरु राहणार असून अवैध धंदे चालविणार्यांची आर्थिक माहिती गोळा करुन त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.अवैध धंदेवाल्यांना मदत करणार्‍यावर देखिल पोलिसांची नजर राहणार असून यापुढिल काळात हे सर्व अवैध धंदे पुर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाPoliceपोलिस