PMRDA Action: अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा; १६ गुंठ्यातील '१४ रो हाऊसेस' जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:46 PM2021-10-14T17:46:28+5:302021-10-14T17:54:13+5:30

मौजे वाघोली तालुका हवेली येथील गट नंबर 365 मध्ये बांधलेल्या अनाधिकृत रो हाऊसेस वर (PMRDA) पीएमआरडीच्या हातोडा मारण्यात आला.

PMRDA action on unauthorized construction 14 row houses demolished | PMRDA Action: अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा; १६ गुंठ्यातील '१४ रो हाऊसेस' जमीनदोस्त

PMRDA Action: अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा; १६ गुंठ्यातील '१४ रो हाऊसेस' जमीनदोस्त

googlenewsNext
ठळक मुद्देपीएमआरडीए कार्यक्षेत्रातील बांधकाम धारकांनी सक्षम अधिकारी यांच्या परवानगीशिवाय बांधकाम करू नये

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत बांधकामासाठी पीएमआरडीएच्या (PMRDA) वतीनं अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु परवानगी न घेतल्यास बांधकाम केले असता अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मौजे वाघोली तालुका हवेली येथील गट नंबर ३६५ मध्ये बांधलेल्या अनाधिकृत रो हाऊसेस (row houses) वर पीएमआरडीच्या वतीने हातोडा मारण्यात आला. कारवाईसाठी चार पोकलेनचा वापर करण्यात आला असून १६ गुंठ्यातील एकूण १४ रो हाऊसेस जमीनदोस्त करण्यात आली. 

यावेळी पीएमआरडीएच्या अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागाकडून जनतेला आव्हान करण्यात आले की, पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील बांधकाम धारकांनी सक्षम अधिकारी यांच्या परवानगीशिवाय बांधकाम करू नये. तसेच त्यांनी सर्व परवानगी असल्याची खातरजमा करूनच फ्लॅट किंवा घरे विकत घ्यावी. 

सदर बांधकाम निष्कासन कारवाईच्या वेळी पीएमआरडीएचे अधिकारी पोलीस उपायुक्त व नियंत्रक निलेश अष्टेकर, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह तसेच स्थानिक पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: PMRDA action on unauthorized construction 14 row houses demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.