लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 14:15 IST2020-04-05T14:14:05+5:302020-04-05T14:15:33+5:30
लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून सेवा पुरवली जाते. यात दरराेज 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा
पुणे : संचारबंदी लागु झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून दररोज अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाºयांसाठी बससेवा पुरविली जात आहे. दररोज सुमारे साडे नऊ ते दहा हजार जणांची ने-आण केली जात आहे. त्यामुळे ससून, नायडू, वायसीएम या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, अत्यावश्यक सेवेतील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
देशात संचारबंदी लागु होण्याआधी शहरात जमावबंदी करण्यात आली होती. या कालावधीतच पीएमपीच्या बसची संख्या निम्म्याने कमी करण्यात आली होती. पण बसमधील गर्दी कमी होत नसल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाºयांसाठी ही सुविधा सुरू ठेवण्यात आली. संचारबंदी लागु झाल्यानंतर संचलनात केवळ १०० ते ११० बस ठेवण्यात आल्या आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील ५० हून अधिक मार्गांवर दर तासाला या बस सोडल्या जात आहेत. तेरा आगारांमार्फत हे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभरात या बसमधून सुमारे साडे नऊ ते दहा हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यातून पीएमपीला दररोज सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
पुणे महापालिकेच्या विनंतीनुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांना मोफत प्रवास करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अशी विनंती नसल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून तिकीटाचे पैसे घेतले जातात. दिवसभराचे संचलन पुर्ण झाल्यानंतर सर्व बस रात्रीच्यावेळी संबंधित आगारामध्ये स्वच्छ केल्या जातात. त्यानंतरच या बस दुसºया दिवशी मार्गावर पाठविल्या जात आहेत. तसेच मागणीनुसार ससून, नायडू रुग्णालय तसेच पोलिसांनाही संशयित रुग्ण किंवा घरी पाठविण्यात येणाºया रुग्णांची ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या बससाठी शहरातील जवळच्या चालक व वाहकांचीच नेमणुक केली जात आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेबाबतही दक्षता घेतली जात असल्याची माहिती वाहतुक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.-