शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:52 IST

कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती, त्यावेळी बसने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला

कात्रज : कात्रज घाट वळणावर मंगळवारी सकाळी पावणे नऊ दरम्यान दुचाकी व पीएमपीएमएलचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. 

या अपघाताबाबत सदर माहिती अशी की, कात्रज आगाराची कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती. पीएमटीने दुचाकीला  पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात आकाश रामदास गोगावले (वय 29 वर्षे रा. ससेवाडी ता. भोर) व अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27)  यांचा मृत्यू झाला असून असून नेहा कैलास गोगावले (वय 20 वर्ष रा.ससेवाडी ता.भोर) या जखमी असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. 

पीएमटीचे चालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42 वर्ष रा. आर्वी, पुणे) यास ताब्यात घेतले असून त्यास वैद्यकीय तपासणी साठी पाठवण्यात आले आहे.  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी होती. भारती विद्यापीठ वाहतूक विभाग व आंबेगाव पोलीस स्टेशन कडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कात्रज चौकापासून कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गुजर निंबाळकरवाडी फाटा तसेच भिलारेवाडी या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. सकाळी व सायंकाळच्या वेळी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. या अगोदर देखील अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यावरती उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : कात्रज घाट अपघात: बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन ठार, एक जखमी

Web Summary : कात्रज घाटात पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक बसून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये आकाश गोगावले आणि अनुष्का वाडकर यांचा समावेश आहे. पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून तपास सुरू आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजAccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाhospitalहॉस्पिटलPMPMLपीएमपीएमएल