शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी सलाईनवर

By admin | Updated: July 5, 2014 06:09 IST

दिवसेंदिवस पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी तोटा वाढत चालला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तोट्यात तब्बल दुपटीने वाढ झाली

पुणे : दिवसेंदिवस पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी तोटा वाढत चालला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तोट्यात तब्बल दुपटीने वाढ झाली असून, तोटा १३१ कोटींपर्यंत वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सलाईनवर असलेल्या पीएमपीला महापालिकेकडून पहिल्या टप्पात १३ कोटी ६४ लाख रुपयांची उचल देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिवहन मंडळाचे २००७ला एकत्रीकरण करून पीएमपीची स्थापना करण्यात आली. स्वतंत्र कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या करारानुसार, पहिली तीन वर्षे दोन्ही पालिकांनी पीएमपीस अर्थसहाय्य देण्याचे ठरले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही पीएमपी सक्षम होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा दोेन्ही पालिकांना मदत करण्याविषयी आदेश दिले आहेत. त्यानुसार अर्थसंकल्पाच्या २.५ टक्के निधी पीएमपीसाठी राखीव ठेवला जातो. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात पीएमपीसाठीच्या तरतुदीचा शेवटचा हप्ता १२ कोटी अधिक विद्यार्थी पासचे १ कोटी ६४ लाख असे १३ कोटी ६४ लाखाची उचल देण्याविषयी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)